श्री तनसुखदास राठी विद्यालय वऱ्हा चे घवघवित यश



                प्रतिनिधी, शशांक चौधरी- 


मार्च 2023 शालांत परीक्षेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले . यावर्षी एकूण 74 विद्यार्थी ई.10 वी च्या परिक्षेला बसले होते पैकी  72 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 18 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, 36 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 18 विद्यार्थी  उत्तीर्ण झाले आहेत . शाळेचा एकूण निकाल 97.29% इतका आहे..

 यामध्ये अथर्व प्रशांत टिंगणे हा 500 पैकी 478 गुण म्हणजेच घेवून 96.60% गुण घेवून प्रथम आला आहे, तर  

कु. प्रांजली गौतम नारे व प्रणाली राजेंद्र येरने यांनी  500 पैकी  443 म्हणजेच  88.60% गुण घेवून द्वितिय क्रमांक पटकावला तसेच कु. रोहिणी दिलिप शिरपुरे  500 पैकी 426 गुण घेवून म्हणजेच 85.60% इतकी  टक्केवारी  प्राप्त करून विद्यालयातून तीसरा क्रमांक प्राप्त केला. शाळेचे मुख्याध्यापक राजेश पवार सर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्प देवून व पेढे भरवून कौतुक केले. 

या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. या निमित्य श्री गणेशदास राठी छात्रालय समिति अमरावती संस्थेचे अध्यक्ष  वसंतकुमार मालपाणी तसेच संस्थेचे सचिव  डॉ. गोविंद लाहोटी, उपाध्यक्ष जुगलकिशोर  गट्टानी, शाळा समिती अध्यक्ष तसेच संस्थेचे सहसचिव मोहन कलंत्री व सर्व पदाधिकारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना भावी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या तसेच विद्यालयाचा निकाल 97.29% लागल्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले .

Post a Comment

Previous Post Next Post