रिपाइं (ए) च्या जिल्हाध्यक्षांना मुंबईत नियुक्तीपत्र प्रदान





 मूर्तिजापूर - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या अकोला जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सिमा सरदार व जिल्हा कार्याध्यक्ष पदी सरीता मनोहर यांची नियुक्ती करण्यात आली असून 




पक्षाच्या चेम्बूर (मुंबई) स्थित केंद्रीय कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे, प्रदेश अध्यक्षा सुनिता ताई चव्हाण यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, केंद्रीय कार्यालय प्रमुख तानाजी मिसळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. पक्षाच्या अकोला जिल्हा शाखेच्या वतीने यावेळी रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे, प्रदेश अध्यक्षा सुनिताताई चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, कार्यालय प्रमुख तानाजी मिसळे यांचा शाल, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अकोला जिल्हा संपर्कप्रमुख सचिन कोकणे, जिल्हाध्यक्ष अजय प्रभे, जिल्हा उपाध्यक्ष पंजाबराव किर्दक, अकोट तालुका अध्यक्ष राजकुमार वानखडे , शहर कार्याध्यक्ष राजेश तेलगोटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सिमा सरदार, जिल्हा कार्याध्यक्षा सरिता मनोहर, मूर्तिजापूर तालुकाध्यक्षा रविना मनोहरे, शहर कार्याध्यक्षा संगिता प्रभे, अकोट तालुका उपाध्यक्षा अनुरिती गुहे, श्रीमती इंगळे, श्रीमती सरदार ताई उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post