औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
शिवसेनेच्या वंदना सतीश सावंत यांची सरपंच पदी निवड ; शिवसेनेच्या वतीने करण्यात आला जल्लोष
सोयगाव तालुक्यातील सर्वात शेवटचे गाव पिंपळवाडी सोयगाव तालुख्याहुन 70 किलोमीटर अंतरावर असलेले व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत बसलेले एक छोटेसे खेडेगाव या गावच्या सरपंच पदी कृषिमंत्री अब्दुल सत्तार समर्थक
वंदना सतीश सावंत यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर शिवसेनेच्या वतीने गावात जल्लोष करण्यात आला.
दिनांक 2 जुन 2023 वार शुक्रवार रोजी पिंपळवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड प्रक्रिया होती. सकाळी दहा ते बारा पर्यंत उमेदवारी अर्ज भरणे , बारा ते एक पर्यंत छाननी, एक ते दोन पर्यंत माघार व दुपारी दोन वाजता सरपंच पदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच पदासाठी वंदना सतीश सावंत व प्रियंका ईश्वर बंडे या दोन्ही महिलांनी
उमेदवारी अर्ज दाखल केला यामध्ये दुपारी दोन वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. कृषिमंत्री अब्दुल सत्तार समर्थक
वंदना सतीश सावंत व प्रियंका ईश्वर बंडे
यांना प्रत्येकी दोन दोन मते मिळाल्याने दोघांना सारखे मते मिळवल्यामुळे त्यांची चिठ्ठीद्वारे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली वंदना सतीश सावंत यांना सरपंच पदासाठी विजय घोषित करण्यात आले.
या निवडीसाठी पूर्ण ग्रामपंचायत सदस्य मतदानासाठी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त होता फरदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक
पोलीस निरीक्षक भारत मोरे सावळतबारा पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी, पोलीस अमलदार शिवदास गोपाळ, व महिला पोलीस व पिंपळवाडी येथील पोलीस पाटील यांनी चोख बंदोबस्त देऊन शांतता कायम ठेवली निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी सोयगाव तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी तलाठी शेलकर अप्पा त्यांचे कर्मचारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडून घेतली.
वंदना सतीश सावंत यांची सरपंच पदी निवड होताच शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शिवाप्पा चोपडे , पिंपळवाडी माजी सरपंच गंगाधर सदाशिव, माजी सरपंच संतोष भगवान आडेकर, उपसरपंच दिपाली कैलास मुळे, ग्रामपंचायत सदस्य प्रियंका ईश्वर बंडे ,सुरेश राघो खरे, गावातील प्रतिष्ठित नागरिक तानाजी अंकुश सोनवणे नितीन शेळके, भास्कर सोनवणे, सागर जाधव ,कार्यकर्ते गणेश खैरे भारत नप्ते सावळदबारा ग्रामपंचायत सदस्य मोहन सुरडकरआदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.