दहावीचा 100%निकाल
चांदूरबाजार तालुका प्रतिनिधी मयुर खापरे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम इंग्लिश माध्यमिक शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षी सुद्धाकायम ठेवली ..
यावर्षी विद्यालयातून एकूण ७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 72 विद्यार्थी उत्तीर्ण झाले झालेले आहेत त्यापैकी28 विद्यार्थी 91 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन प्रावीण्यश्रेणी प्राप्त केली आहे तसेच 30 विद्यार्थी 81 टक्के पेक्षा जास्त गुण घेउन उत्तीर्ण झाले, 10 विद्यार्थी 71%पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेत , 4 विद्यार्थी 61%गुण घेऊन उत्तीर्ण झाले शाळेचा निकाल 100% टक्के लागला असून त्यामध्ये
तालुक्यातून प्रथम कु समृद्धी अरुण आमझरे या विद्यार्थिनीला 98 टक्के गुण मिळाले आहेत
तसेच कु.सुहानी देवानंद चौधरी या विद्यार्थिनीने 97.60% गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला तर कु रसिका प्रफुल्ल टेकाडे या विद्यार्थिनीला 97 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला . विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा , तसेच ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बाबुरावजी इंगोले व सर्व पदाधिकारी , शाळेचे मार्गदर्शक पंडितराव वा. मोहोड ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ महानंदा खांडे व सर्व शिक्षक शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. तसेच शाळेच्या शिक्षकांनी अपार मेहनत घेतल्या मुले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. महानंदा खांडे, पर्यवेशक मनीष मोहोड व वर्षा तायवाडे तसेच सब्जेक्ट टीचर संदीप भुयार, चेतन सिंघन, अस्विनी भाकरे , शिल्पा गोमकाले मॅडम यांचे संस्थेच्या तसेच शाळा समिती च्या अध्यक्षांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला, व भविष्यात शाळेची अशीच प्रगती होवो ह्या शुभेच्या दिल्या।