27 विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण
कुऱ्हा गावातून प्रथम येण्याच्या बहुमान
प्रतिनिधी, शशांक चौधरी -
अशोक शिक्षण संस्था अशोकनगर द्वारा संचालित कुऱ्हा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कुऱ्हा हायस्कुल कुऱ्हा निकालाची परंपरा कायम राखली. मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परीक्षेचा निकाल ७९.७७ % टक्के एवढा निकाल लागला. कुऱ्हा हायस्कुल कुऱ्हा मधून एस. एस. सी .परीक्षेला ८९ विद्यार्थी प्रवेशित झालेले होते. पैकी २७ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले व १८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्य प्राप्त केलेले आहे. तर १७ विदयार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले आहे. एकूण ७१ विदयार्थी पास झाले.
कुऱ्हा हायस्कुल कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम राखत विद्यालयामधून सेमी इंग्रजी माध्यमाची कु. देवार्ती दिगाम्बर कुरळकर हीने ९५. ८०% टक्के गुण प्राप्त करून कुऱ्हा हायस्कुल मधून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. द्वितीय क्रमांक कु. सलोनी फुलचंद आडे ९३.६०% टक्के गुण प्राप्त केले. तर तृतीय क्रमांक कु. जागृती मुरलीधर धोत्रे हिने ९२.२०% टक्के गुण प्राप्त करून मिळविला आहे. तर चौथ्या क्रमांक कु.मनश्री श्रीकांत शिंगाणे हिने ९२ टक्के गुण मिळवले. कु. श्रावणी गजानन दारोकार हिने ९१.४०% टक्के गुण प्राप्त केले.तसेंचक कु. धनश्री गजानन ठाकरे हिने ९१. टक्के, कु. अधिका प्रमोद धुळे ९०. ६०%, कु.भूमिका रवींद्र तिरमारे ८९.८०% त्याच प्रमाणे मराठी माध्यमातून कु. राखी संतोष गायगोले प्रथम क्रमांक प्राप्त केला, तर कु. वैष्णवी अतुल जडे हिने व्दितीय क्रमांक प्राप्त केला. कु. निशा बंडू कोराम ही तृतीय आलेली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त टक्के गुण प्राप्त करून या विद्यार्थ्यांनी कुऱ्हा हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा बहुमान वाढविला आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन अशोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय मा. सुधीरकुमार नारायण शेंडे व कार्यकारिणी मंडळातर्फे तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. एस. पी. सामुद्रे, जेष्ठ शिक्षक सर्व शिक्षकवृंद, व शिक्षकेतर कर्मचारी वर्गातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकवृंदा तर्फे प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.