यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी गजानन लांडगे
मागील काही काळापासून महागाव पोलीस स्टेशनचा कारभार प्रभारी ठाणेदारा मार्फत सुरू होता प्रभारी ठाणेदार असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या ठोस कारवाया होत नव्हत्या, तालुक्यात गुन्हेगारीने चरण सीमा ओलांडी होती, सर्व तालुक्यांमध्ये अवैद्य धंदे खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते.
त्यामुळे तालुक्यातील जनतेला अनेक समस्याला सामोरे जावे लागत होते, याच कारणामुळे सरपंच संघटनेने महागाव पोलीस स्टेशनला कायमस्वरूपी ठाणेदार देण्यात यावा.
ही मागणी बर्याचदा केली होती, ती मागणी खुप कालावधीनंतर पूर्ण झाली असून तालुका सरपंच संघटनेमध्ये याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.कायमस्वरूपी ठाणेदराच्या नियुक्तीमुळे ठोस पावले उचलली जातील आणि तालुक्यातील गुन्हेगारीला आळा बसेल, आणि हा हेतू पुर्ण होईल असी आशा बाळगून तालुका सरपंच संघटने मार्फत महागाव पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले ठाणेदार दीपक ढोमणे पाटील यांनी महागाव पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्याबद्दल मोठ्या उत्साहाने सरपंच संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला आहे.
याप्रसंगी उपस्थित सरपंच संघटना अध्यक्ष अमोल चिकणे,उपाध्यक्ष जयश्री राठोड, उपस्थित सरपंच आशाताई कांबळे, दिनेश रावते, इंदल राठोड, दिगंबर राजने, संतोष कोरके, अमोल चव्हाण, वैभव बर्डे, गजानन बुडाळ, प्रमोद भगत, बंडू मुनेश्वर, तातेराव वानखेडे, मधुकर कांबळे, सुनील राठोड, इत्यादी गावातील सरपंच उपस्थित होते..