विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
अकोला : स्थानिक न्यू तापडिया नगरमधील कलावती हॉस्पिटलचे संचालक डॉ. विवेक शेगांवकर यांची कन्या की.अवंती शेगांवकर हिने दहावीच्या परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्याने उत्तिर्ण होण्याचा बहूमान प्राप्त केला आहे.तिला इंग्रजी आणि मराठी या भाषा विषयांमध्ये समान ९८ तर गणितामध्ये ९९ आणि संस्कृत या कठीण विषयात पूर्ण १०० मिळाले गुण असून सामाजिक शास्त्र ९८ तर विज्ञान तंत्रज्ञानात तिने ९६ गुण पटकावले आहेत.
ती माउंट कारमेलची विद्यार्थीनी असून आपल्या यशाचे श्रेय ती आई वडील आणि गुरूजणांना देते.तिने प्राप्त केलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.