चंद्रपूर / चिमूर : नुकताच दि 2 जूनला शालांत परीक्षेचा निकाल लागला असून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी जनता विद्यालय नेरीचा निकाल 96.10 टक्के लागला असून प्राविण्य श्रेणी प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी सर्वच विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करीत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे यात नकुल अजय सोमनाथे 95.20 टक्के घेत प्रथम क्रमांक पटकावला तर आर्या श्रीकृष्ण पिसे 90.60 टक्के घेत द्वितीय तर दक्ष नरेंद्र पंधरे याने 90.20 टक्के घेत तृतीय क्रमांक पटकावला असून विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे..
विद्यालयात यावर्षी 77 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी26 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर 32 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि 16 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा न दिल्यामुळे शाळेचा निकाल 96. 10 टक्के लागला असून उज्वल यशाची परंपरा कायम आहे उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने प्राचार्य तथा मुख्याध्यापक एस एन येरने यांनी अभिनंदन केले आहे तसेच शिक्षण संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने सुद्धा अभिनंदन केले आहे या उज्वल कामगिरी करणाऱ्या विध्यार्थ्यांचे शालेय शिक्षकांचे आणि शाळेचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..