सोयगाव : तालुक्यातील फर्दापूर येथे जमाते इस्लामी हिंद मार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात अब्दुल समी साहेब यांनी फर्दापूर येथे या कार्यक्रमात जनतेला सांगितले की आपण सर्व एक आहोत. त्यामुळे समाजात कुठेही कसलेही काम असेल तर एकमेकांना समजून घ्या आणि सहकार्य करा आपल्या लहान मुलं व मुली सांगले संस्कार घ्या तसेच या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी जामा मस्जिदचे शाई इमाम अलीम अहमद कादरी सोसायटीचे चेअरमन जगन्नाथ गवांडे ,शेख रफिक, गजानन शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य विलास वराडे, प्रकाश शिंदे ,अण्णा तांगडे ,सुखदेव सोनवणे, काशिनाथ लंबे, संदीप दामोदर, सुदर्शन पवार शहर अध्यक्ष समाधान बावस्कर, दीपक बावस्कर, डॉक्टर इमरान शेख, जावेद शेख, पत्रकार मंडळी शेख सादिक, शिवाजी महाकाळ, रमेश पाटील, सागर भुजबळ, शेख हक्कानी बिरारे शेख अजहर हे आदी उपस्थित होते यावेळी जमाते इस्लामी हिंद मार्फत हिंदू बांधवांना मराठी भाषेतून कुराण ही मोफत देण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी शीर खुर्मा ही देण्यात आला या शीर खुर्मा च्या नंतर ही कार्यक्रम संपन्न झाला..