६ महिने लोटूनही रस्त्याचे काम अपूर्ण
भद्रावती, डॉ अमृत कुचनकर विशेष प्रतिनिधी :- भद्रावती नगरपरिषद क्षेत्रामधून प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत नागमंदिर चौक, विजासन ते देऊळवाडा या रस्त्याचे बांधकाम मंजूर असून या रस्त्याचे काम नागमंदिर चौक ते विजासन पावेतो मधोमध 4 मीटर रुंद व अंदाजे एक 1.5 फूट उंच असे अर्धवट रस्त्याचे बांधकाम केलेले आहे. 4 मीटर रुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला अंदाजे 1.5 मीटर जागेवर पेव्हिंग ब्लॉक लावण्यात येणार होते ते पेव्हीग ब्लॉक अजून पर्यंत लावलेले नाहीत. हा रस्ता विजासन, देवळवाडा, चारगाव, कुनाळा कोल माईन्स तसेच विजाशन पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जाणारा हा एकमेव रस्ता व मार्ग आहे. हे काम सुरू होऊन 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. अर्धवट 4 मीटर रुंद रस्त्याचे काम पूर्ण होऊन तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे. परंतु अजून पर्यंत या रस्त्याच्या दोन्ही बाजूची पेव्हिंग ब्लॉक लावण्याची साइडिंग न भरल्याने या अप्रोच रस्ते न जोडल्यामुळे या अरुंद रस्त्याने वाहतूक करणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्याच्या खाली उतरून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या होणाऱ्या अपघाताचा रोष नागरिकाकडून नगर परिषदेवर व्यक्त करण्यात येत असल्याने नाग मंदिर चौक ते विजासन पावे तो रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट वसाहत असुन नागरिकांची ये जात असेच विजासन, देऊरवाडा, चारगाव, कुनाळा कॉलमाईन्स व विदासन पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ लक्षात घेता या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याकरिता नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपनगराध्यक्ष संतोष आमने व माजी नगराध्यक्ष प्रफुल चटके हे उपस्थित होते.