सोनामाय विद्यालयाची उत्कृष्ट यशाची परंपरा कायम

 



एस.एस.सी. परिक्षेचा ८२.५० टक्के एवढा निकाल




प्रतिनिधी, शशांक चौधरी 


संत सदाराम महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित सोनामाय विद्यालय कौंडण्यपूर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुध्दा सोनामाय विद्यालयाची निकालाची परंपरा कायम राखली. मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या एस. एस. सी. परिक्षेचा ८२.५० टक्के एवढा निकाल लागला. या विद्यालयातून प्राविण्य श्रेणीमधून नंदिनी मेहकर हिने ८६.२० टक्के गुण प्राप्त करून प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आहे. द्वितीय क्रमांक पुनम केवदे हिने मिळविला. प्रथमश्रेणी मधुन प्रबुद्ध पखाले याने ७२.२० टक्के गुण प्राप्त करून प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आहे. द्वितीय क्रमांक अंकिता केवदे हिला ७१.४० टक्के गुण प्राप्त झाले तर तृतीय क्रमांक मिनल पारीसे हिला ६७.८० टक्के गुण मिळाले. चौथा क्रमांक शालीनी धवने हिला ६३.८० टक्के गुण प्राप्त झाले. आणी पाचवा क्रमांक कार्तीकेश ठाकरे याला ६१.२० टक्के गुण मिळविले. त्याचप्रमाणे उत्तीर्ण श्रेणीतील विद्यार्थी पूर्वा गोहत्रे, सुमित केवदे, गहलोतकर, राणी जाधव, मयुरी राठोड, लवकेश अनेरकर, तन्मय डुबे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संत सदाराम महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेषरावजी सत्रे, उपाध्यक्ष अशोक राव इसळ, सदस्य अविनाशभाऊ सत्रे व कार्यकारणी मंडळातर्फ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापिका रूपाली अ. सत्रे, सह शिक्षक एस. एस. पांडव, एस. एम. गंधे, पी. एस. केचे, शेख वशीम, एस.एस. खंडारे व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गातर्फ गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे विद्यालयातर्फे प्रत्येक गृहभेटीद्वारे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post