अनेक घराची टिन पात्रे उडाली तर अनेक घराची कवेलु उडून लाखो रुपयांचे नुकसान

 




अचानक आलेल्या गारपीट चक्री वादळ गारपीट पावसाने बोथली येथील अनेक घराचे नुकसान






प्रशासनाने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी


          


  चंद्रपूर /सुनिल कोसे/ चिमूर  : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या बोथली येथे आज दुपारी 2 वाजता दरम्यान अचानक आलेल्या चक्रीवादळ गारपीट पावसाने गावकऱ्यांची भंबेरी उडवली असून अनेक घरावरील टिनाचे पत्रे , घरावरील कवेलू तर काही चे घरे पडले असून अनेक झाडे तुटून पडले आहेत यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाने या गंभिर बाबीची दखल घेऊन पंचनामे करून नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

            अचानक दुपारी चक्रीवादळ गारपीट पावसाने आगमन करीत रौद्र रूप धारण करीत नेरी तळोधी मार्गावरील रस्त्यावर अनेक झाडे उलमुळुन पडले तसेच या वादळाने व पावसाने क्षणात बोथली गावातील नागरिकांचे खूप मोठे नुकसान केले यात या वादळाने अनेक झाडे तुटून पडले अनेक घराची टिनपत्रे उलटुन पडली तर काहींच्या घरावरील कवेलू उडून गेले अनेकांच्या घरात पाऊस घुसले आणि आतील साहित्याचे नुकसान झाले सदर बाब लक्षात घेता प्रशासनाने नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांचे पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत..

Post a Comment

Previous Post Next Post