कोरपना, अमृत कुचनकर विशेष प्रतिनिधी : तालुक्याला आज दुपारी प्रचंड वादळी पावसाचा तडाखा बसला. दरम्यान वडगाव येथे झाड कोसळून महिलेचा मृत्यू झाला.
वडगाव येथील शेतात कामाला गेलेल्या वैशाली गोवर्धन उरकुडे (वय 35) या महिलेवर झाड कोसळून जागीच मृत्यू झाला. गुलाव जिवतोडे यांच्या शेतात सरकी टिबायला सदर महिला गेली होती. आज 10 जून रोजी दुपारी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे ती झाडाखाली थांबली. तेव्हा झाड कोसळून तिचा मृत्यू झाला.