रेल्वे स्टेशनवर प्रवाश्याचा मृत्यू
बल्लारपूर- मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे जंक्शन पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने प्रकाशझोतात आला होता, आता पुन्हा या रेल्वे जंक्शन वर एक दुर्घटना घडली आहे.
14 जून ला सकाळच्या सुमारास रेल्वे जंक्शन वर मालगाडी च्या धडकेत एका प्रवाश्याचा मृत्यू झाला, धडक इतकी जोरदार होती की त्या प्रवाश्याच्या शरीराचे 2 तुकडे झाले.
मृतक प्रवासी हा चेन्नई येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली असून सध्या त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.