सोयगाव तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आळंदी येथे वारकर्यावरती लाठी हल्ला करण्यावर पक्षाच्या वतीने करण्यात आला जाहीर निषेध

 





आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडी मधे रविवार 11 जुन रोजी वारकऱ्यावर पोलिसांकडून सौम्य लाटी चार्ज करण्यात आला होता

        

जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख 



संभाजीनगर  : जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने दिनांक 13 जुन मंगळवार रोजी व शिवसेना तालुका प्रमुख दिलिप मचे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज दिंडीमधील वारकऱ्यावर दिनांक 11 जुन रविवार रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले यादरम्यान आळंदी मध्ये वारकरी आणि पोलीस यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला दरम्यान पोलिसांकडून सौम्य ताठी चार्ज करण्यात आला होता.

 वारीच्चा इतिहासात पहिल्यांदाच ही घटना घडली असून शिंदे फडणवीस सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रातील संस्कृत परंपरा नासविण्याचे काम सुरू आहे. हि क्रूर वाईट घटना आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना असुन घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी.

    अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुख दिलीप मंचे व शहर प्रमुख वारकरी संप्रदाय शिवसेना कार्यकर्ते यांच्यावतीने तहसीलदार तथा दंडाधिकारी तहसील कार्यालय सोयगाव जिल्हा संभाजीनगर येथे निवेदनाद्वारे करण्यात आले..

Post a Comment

Previous Post Next Post