रस्ता बनवून देण्याचे दिले शब्द केले पूर्ण
नेरी वार्ड क्र 4 च्या महिला पुरुषांनी व विद्यार्थ्यांनी मेंबर निखिल पिसे यांचे त्याच रस्त्यावर शाल श्रीफळ देऊन जोरदार स्वागत
चंद्रपूर/ चिमूर, सुनिल कोसे : नेरी नवरगाव मार्गावरील दिवाकर वाघे यांच्या घरापासून बौद्ध विहारापर्यंत च्या रस्त्यासाठी मागील पाच वर्षांपासून वार्ड क्र 4 च्या नागरिकांचा संघर्ष सुरू होता यासाठी मागील वर्षी दोन वेळा आंदोलन करण्यात आले.
अनेकांनी रस्त्याचे मोजमाप नेले परंतु संपूर्ण दुर्लक्ष,त्यामुळे मागील पावसात शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यासाठी आर्त हाक दिली तेव्हा ग्रा प सद्स निखिल पिसे यानी हाकेला धावून जात रस्ता पूर्ण करण्याचे शब्द दिला आणि दिला शब्द पूर्ण करीत यावर्षी नुकतेच या रस्त्याचे बांधकाम सुरू असून प्रगतिपथावर आहे.
सदर रस्त्यासाठी मागील पाच वर्षांपासून संघर्ष सुरू होता अनेक नेते मंडळींनी यासाठी निवडणूक लागताच आस्वासन दिले होते परंतु कोणीही लक्ष दिले नाही अनेकांच्या सत्ता आल्या व गेल्या पण संपुर्ण दुर्लक्ष झाले तेव्हा मागील वर्षी आंदोलन सुद्धा करण्यात आले. तसेच शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विध्यार्थ्यांनी मेंबर भाऊ मेंबर भाऊ रस्ता बनवून दे न गा अशी आर्त हाक गाण्याच्या माध्यमातून दिली होती ती गाणे समाजमाध्यमात प्रसिद्ध झाले होते.
तेव्हा या वार्डाचे सदस्य निखिल पिसे यांनी शब्द दिला आणि रस्त्यासाठी निधी मंजूर करून या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून पूर्ण होणार आहे सदर बांधकामाला विरोध केला होता व रस्ता अर्धवट बांधकाम करण्याचे सांगितले होते आणि काही दिवस काम ही थांबवले असे नागरिकांनी सांगितले.
तेव्हा निखिल पिसे यांनी न डगमगता पूर्ण बांधकाम करण्याचे ग्रां प ला ठासून सांगितले आणि पूर्ण रस्ता बनवून घेतला त्यामुळे ग्रा प सद्स निखिल पिसे यांनी नागरिकांचे मन जिकले बोलल्याप्रमाणे रस्ता पूर्ण करून दिल्यामुळे त्यांचा वार्डातील नागरिकांनी त्याच रस्त्यावर शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी वार्डातील नागरिक महिला पुरुष बालगोपाल उपस्थित होते.