औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
औरंगाबाद : संपूर्ण औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील शासकीय गायरान जमीन व वन विभागावरील जमिनीवरती अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण निष्काशीत न करता त्यांना न उठवता बेघर भूमीही दलित आदिवासी व्यक्तींना त्यांचे अतिक्रमण गायरान जमिनी नियमाकुल करून त्यांच्या नावाने सातबारा व आठ चा उतारा देण्याकरिता क्रांतिवीर बिरसा मुंडा च्या संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रकाश पांडुरंग सुरडकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालय औरंगाबाद येथे आदिवासी भिल्ल समाज व महिला उपोषणाला बसले आहे या उपोषणाच्या वेळेस माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या दलित आदिवासी समाज हे सन 1972 च्या पूर्वीपासून गायरान व वन विभागीय जमिनीवर अतिक्रमण करून राहत असून ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेे.
यासंदर्भात त्यांना वेळोवेळी तुरुंगातही जावे लागेल महत्वाचे म्हणजे गोरगरीब आदिवासी मागासवर्गीय समाजाला अतिक्रमाबाबत ज्या नोटिसा आल्या आहेत या तात्काळ रद्द करण्यात याव्या सर्व दलित आदिवासी समाजाला त्यांच्या जागेवरच स्थायिक करून त्यांच्या नावे सातबारा व नमुना आठ चा उतारा यावरती नोंद घेण्यात यावी व सर्व समाजाला स्वतःच्या मालकी हक्काचे पुरावे देण्यात यावे जिल्हाधिकारी साहेबांनी दलित मागासवर्गीय आदिवासी समाजाला न्याय देऊन अतिक्रमण रहित धारकांच्या नावे करून देण्यात यावे अशी मागणी आदिवासी संघटना क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.