श्री कान्होजीबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंजनसिंगी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजन.





श्री गुरुदेव सेवा मंडळाचा सहभाग



प्रतिनिधी, शशांक चौधरी -


अशोक शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री कान्होजी बाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंजनसिंगी येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने योगा प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य भाऊराव गाढवे हे होते.दिनांक 21जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असून प्रंतप्रधान मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान महोदय यांच्या प्रयत्नाने युनोने आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता दिली आहे व सन 2015 पासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. या वर्षीचा 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिनाची टँगलाईन "हर आंगन योग" असून " योगा फाँर वसुधैव कुटुंबकम" या संकेतल्पनेवर साजरा केला आहे. सध्याचे वाढते असांसार्गिक रोग, बदललेली जीवनशैली व त्यामुळे येणारा ताणतणाव यांचा विचार करता दैनंदिन अष्टांग योग अंगिकारणे ही काळाची गरज बनलेली आहे योगशास्त्र हे प्राचीन भारतीय परंपरा जगाला दिलेली अमुल्य ठेव आहे.

यावेळी गुरुदेव सेवा मंडळ अंजनसिंगी चे महेंद्र काळे, विशाल ठाकरे सहभागी झाले. यावेळी प्राध्यापक. अतुल ठाकरे, प्रा. दिपक अंबरते, प्रा. प्रफुल श्रीखंडे, तसेच विनोद इंगोले, सतीश उईके, मनोज सोळंके, लिलाधर देशमुख, प्रविण राठोड, प्राध्यापिका. उज्वला चांबटकर, तसेच शेखर झाडे, संजय ठाकरे, सुनिल ठाकरे यांनी योगा प्रात्यक्षिक मधे सहभाग घेतला तसेच वर्ग 12 मधील कु. भुमिका नवरंगे, राधिका ढोरे, वैष्णवी ठाकरे सहभागी झाले. योगा प्रशिक्षक म्हणून सतिश उईके, विनोद इंगोले क्रीडा शिक्षक यांनी जवाबदारी सांभाळली शेवटी आभारप्रदर्शन व हास्ययोग प्रा. दिपक अंबरते यांनी केले. शेवटी राष्ट्रवंदनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post