चंद्रपूर /सुनिल कोसे, चिमूर : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या खांबाडा येथे प्रकल्प संचालक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चंद्रपूर, यांच्या सहकार्याने आणि कृषी कार्यालय चिमुर अंतर्गत दि 2 जून ला खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला परिसरातील व खांबाडा येथील शेतकऱ्यांनी भाग घेतला होता यात धान कापूस सह अनेक पिकावर तसेच अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
तालुक्यातील खांबाडा येथे खरीप पूर्व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून दातारकर साहेब ( मल्टीटास्कीगी ग्रेडर) उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून डी ए तिखे तालुका कृषी अधिकारी चिमूर व्ही के शेंडे कृषी अधिकारी चिमूर आर एम कन्नके तालुका व्यवस्थापक येसंनकर साहेब कृषी सहायक मान्यवर म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मंगेश धाडसे सभापतीं कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर अरुण पिसे कुशल शेतकरी मान्यवर म्हणून उपस्थित होते कार्यक्रमा सुरवात मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी ए तिखे तालुका कृषी अधिकारी यांनी केले यात त्यांनी खरीप हंगाम पूर्व नियोजन तसेच कृषी विभागाच्या विविध योजना व महाकाट योजनेअंतर्गत एक गाव एक वान या विषयावर मार्गदर्शन करीत विस्तृत माहिती दिली.
यानंतर प्रमुख मार्गदर्शक दातारकर साहेब यांनी महाकाट योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कापूस पिकांवर मार्गदर्शन करताना सांगितले की शेतकरी हे जिनिग व्यापारी झाले पाहिजे यासाठी कापूस पीक पिकवून मर्यादित न राहता कापसा पासून गाठी तयार केले पाहिजे ही काळाची गरज असल्याचे सांगून महाराष्ट्र शासनाने महाकाट योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आणली असून ही योजना जागतिक बँकेच्या साहाय्याने जिल्ह्यात आली आहे आणि तालुक्यातील 15 गावाची निवड करण्यात आली असून यात खांबाडा गावाची निवड केली आहे.
तेव्हा येथील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले यानंतर व्ही के शेंडे यांनी धान पिकावर मार्गदर्शन करताना सांगितले की धान पिकाची लागवड ही पेरणी पध्दतीने केल्यास धान पीक परवडण्यासारखे आहे यामध्ये 10 किलो बियाणे लागते आणि 20 किलोची बचत होते तसेच शेवट पर्यंत अनेक खर्चावर बचत होते पीक लागवडी पासून तर काढेपर्यंत अनेक खर्चात बचत होते.
त्यामुळे ही पद्धत शेतकऱ्यांनी अवलंबवावी असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे संचालन आर एन कन्नके तर आभार श्री येसनकर यांनी केले या कार्यक्रमाला गावातील व परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते..