चंद्रपूर / चिमूर : चिमूर तालुक्यातील नेरी जवळ असलेल्या मौजा सिरपुर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमा अंतर्गत गावात महिला बचत गटात काम करणाऱ्या व महिला विषयी उपक्रम राबविणाऱ्या चार महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने शाल श्रीफळ,सन्मानपत्र,शिल्ड व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात सरपंच वैशाली निकोडे यांनी दोन्ही गावात बालविवाह प्रतिबंध, हुंडा निमुर्लन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध,महिला सक्षमिकरण, महिला स्वंयसहाय्यता बचत गट, आरोग्य , साक्षरता, मुलीच्या शिक्षणात पुढाकार आदी महिला विषयी बाबत उपक्रम राबवावे असे मार्गदर्शनात व्यक्त केले.
या कार्यक्रमाला राजु भानारकर उपसरपंच जिवन बोरकर सदस्य , सुनिता कुंभरे सदस्या , वर्षा डहारे सदस्या ,पुष्पा कापगते सदस्या ,गोपाल गावतुरे ग्रा.प.कर्मचारी मंगेश भानारकर कॉम्पुटर ऑपरेटर,व अंगणवाडी सेविका तसेच गावातील महिला मंडळी उपस्थित होते.