चांदूररेल्वे, राहुल देशमुख : नया सावंगा ता.चांदुर रेल्वे जि. अमरावती येथील सेंद्रिय शेती पद्धतीचे पुरस्कार व गांडूळ खत उत्पादक राहुल बेलसरे यांना सन 2023 चा मानाचा व प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषि रत्न पुरस्कार त्यांच्या शेताच्या बांधावर प्रदान..
नया सावंगा येथे राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न शेतकरी निवड समितीचे अध्यक्ष व ग्रामगीताचार्य पौर्णिमाताई सवाई यांच्या अध्यक्षतेखाली युवा शेतकरी राहुल बेलसरे यांना राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष प्रकाश साबळे तसेच निवड समितीचे सदस्य डॉ. दिलीप काळे, अनुल्ला खान, प्रगतशील शेतकरी विवेक चर्जन, निवड समितीचे सन्माननीय सदस्य प्रा.अमर तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांनी कमी खर्चाची व बिना कर्जाची शेती करून सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी केले.
गांडूळ खत निर्मिती शेतकऱ्यांनी प्रत्येक घराघरात करावी आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी ओळखत गांडूळ खत शेणखत कंपोस्ट खत आधी खतांचा वापर करावा असे मत पौर्णिमाताई सवाई यांनी केले...
राहुल बेलसरे यांचा सहपरिवार सत्कार करण्यात आला परिसरातील बहुतांश शेतकरी उपस्थित होते.