महिला बचत गटाच्या 'गट प्रमुख' ते "समाजसेविका"
असा त्यांचा प्रवास
प्रतिनिधी, शशांक चौधरी -
शासन निर्णयानुसार कुऱ्हा ग्रामपंचायत तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महिला सन्मान सोहळा घेण्यात आला निवड समितीने निवड केलेल्या गावातील समाजकार्यात सतत अग्रेसर असलेल्या महिला बचत गटाच्या गट प्रमुख मा. संगीता प्रदिप पवार आशा वर्कर सुनिता मनोजसिंग उटाळे यांना प्रतिष्ठित नागरिक मा. विजय डहाके, व कुऱ्हा वेल्फेअर फाउंडेशन अध्यक्ष बबलु जयस्वाल यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित ग्रामपंचायत सदस्य राजेश नेवारे, बाबाराव राऊत, प्रियंका शिंगाणे, जोस्ना ईखार ग्रामपंचायत लिपिक संदिप (मामा) तिंतूरकर अंगणवाडी सेविका तालुका प्रमुख गुल्हाने मॅडम आशा वर्कर पर्यवेक्षिका मा. सविता भगत तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स उपस्थित होत्या.
मा. संगीता प्रदीप पवार या अगणित समाजसेवा करत असतात. कुऱ्हा मधील विविध उपक्रमात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या, आपल्या सभोवतालच्या परिसरातील आपल्या समाज उपयोगी कामातून एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, अश्या एक वेगळ्या व्यक्तिमत्त्व म्हणून समाजापुढे सतत एक नवीन उदाहरण निर्माण करनाऱ्या, निसर्गप्रेमी, पशुप्रेमी, पक्षी प्रेमी, तसा म्हणायला जावे तर "समाज सेविका" अशा त्या आहेत. त्यांच्या याच कर्तव्य दक्ष भूमिकेची दखल घेत त्यांना कुऱ्हा ग्रामपंचायत तर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.