चंद्रपूर, अमृत कुचनकर - संत तुकाराम सभागूहत बल्लारपूर येथे ओबीसी समन्वय समितीच्या बल्लारपूर तसेच मराठा सेवा संघ बल्लारपूर संत तुकाराम सेवा मंडळ वतीने राजषी छत्रपती शाहू महाराज जयंती याच्या जयंती निमित्य सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून जयंती व मडल यात्राची मीडिग घेण्यात आली.
या सभेचे अध्यक्ष एड पुरुषोत्तमजी सातपुते तसेच लढा ओबीसीचा जनगणना पाटि लावा अभियान मोहिमेचे प्रणेत्या एड अंजलीताई साळवे,प्रा अनिल डाहाके,विलास माधनकर,पियू यु जरीले हे उपस्थित होते.याप्रसंगी छत्रपती राजषी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
ओबीसीची जात निहाय जनगणना झाली पाहिजे या मुख्य मागणीसाठी विदर्भात पुन्हा एकदा मंडल यात्रा काढण्यात येणार आहे.या मंडल यात्रेच्या माध्यमातून जात निहाय जनगणना व वस्तीगृह, शिष्यवृत्तीसह इतर विषयावरहीये जनजागृती केली जाईल.
ओबीसी समन्वय समिती बल्लारपूरयेथील इतर भटक्या विमुक्त संघटनाकाही निवडक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मंडल यात्रेच्या पूर्वतयारीसाठी सोमवारला ओबीसी, व्हिजेनटी,कार्यकर्त्याची बैठक पार पडली.मागील वर्षी1 ते 7 ऑगस्ट दरम्यान मंडल यात्रा काढण्यात आली होती. यंदा मंडल यात्रेमध्ये जात न्याय जनगणना हा महत्त्वाचा मुद्दाअसून याशिवाय अन्य विषयावर राहणार आहेत.72वस्तीगृह मान्य केले परंतुअजूनही वस्तीगृह सुरू झाले नाहीत.ओबीसीची लोकसंख्या बघताप्रत्येक जिल्ह्यात10वस्तीगृह सुरू झाले पाहिजे व ही संख्या 72 वरून 720 व्हावी. स्वाधार योजना सुरू केली परंतु ती सुद्धा मान्य झालेली नाही.
येत्या 30 जुलै पासून नागपूर संविधान चौक येथून सकाळी 11 वाजता निघेल.नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातून प्रवास करत चंद्रपूर शहरात 7 ऑगस्टला पहिल्या टप्पा 20 20 ऑगस्ट रोजी राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथून सुरुवात होईल आणिोला वाशिम जिल्ह्यातून प्रवास करत 25 ऑगस्ट मंडल जयंतीच्या दिवशी अमरावती येथे दुसऱ्या टप्प्यात समारोप होईल.
विदेशी शिष्यवृत्ती योजना 500 विद्यार्थ्यांचा समावेश व्हावा.वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ मार्फतयुवकांना उद्योगासाठी1000कोटी रुपयाची कर्ज वाटप आणि उद्योग प्रशिक्षण मिळायला हवे असे मुद्दे या मंडल यात्रेत राहणार आहे.
या बैठकीत विवेक खुटेमाटे,मनोहर माळेकर,शंकर काळे,किशोर मोहुले,सुधीर कोरडे,एड मेघा भाले,गोमिता पाचभाई,राजेंद्र खाडे, बोंन्डे सर,गणपती मोरे,उमेश कडू,अमोल काकडे,कुणाल कोरासे, संजय वटाणे ,नागेश गांडलेवार,नागेश्वर रत्नपारखी आदि उपस्थित होते.