चिपळुण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-दुर्दैवाने शिक्षण क्षेत्र हे व्यवसाय होत असताना देखील माझी शाळा माझे विद्यार्थी ही भावना मनोमनी जोपासत केवळ अक्षर ओळखच नाही तर त्यांच्या पंखात गरुड भरारीचे बळ आणण्यासाठी आचही जिल्हा परिषदांचे शिक्षक ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सर्वतोपरी योगदान देत असतात.माझी शाळा माझे विद्यार्थी नामवंत व्हायला हवेत ही भावना,ही ओढ आजही त्यांच्यात आढळून येते ही फार समाधान देणारी बाब आहे आणि म्हणूनच शिक्षक हेच खरे समाजसेवक असतात अस म्हटल्यास वावगे होणार नाही असे प्रतिपादन समारंभाचे अध्यक्ष विश्वनाथ पंडित यांनी केले.तुरंबव(चिपळूण)येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकचे लोकांसह,विद्यार्थीप्रिय शिक्षक ज्यांनी अक्षर ओळखच नव्हे तर इस्त्रो,नासा पर्यंतचे दरवाजे गावातील गरीब मुलांना प्रगतीची कवाडे उघडे करून दिली ते शरद नेटके गुरुजी व पाष्टे गुरुजींच्या बदलीमुळे तुरंबव ग्रामस्थांच्या वतीने निरोप देण्याचा त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या सोहळ्यात ते बोलत होते.सरपंच नेत्राताई पंडित यांच्या हस्ते शरद नेटके व पाष्टे गुरुजींचा शाल श्रीफळ आणि भेट वस्तु देऊन टाळ्यांच्या गजरात सत्कार करण्यात आला.यावेळी उपसरपंच अशोक मोहीते,ग्रामसेवक आवर्जून उपस्थित होते.विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या शिक्षकांना भेटवस्तू देऊन गुरुपूजन केले.तुरंबव ग्रामस्थांच्या वतीने आयोजित समाजसेवक सुनिल शेठ जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कृतज्ञता समारंभात शाळेचे मुख्याध्यापक कवितके,शिक्षकवृंद,सदानंद भुवड,अशोक मोहीते,कृष्णा उकार्डे गौरवमुर्ती शरद नेटके गुरुजी,पाष्टे गुरुजी,सुनिल जाधव यांनी समोयचित विचार मांडले.अजित पालशेतकर,विकास पंडित,सिध्देश शिगवण,श्रीधर पालशेतकर,चंद्रकांत मानसिंग पवार,मोहन वीर आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. समारंभाला ग्रामस्थ आणि महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.