तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याचा दारू पिऊन धिंगाणा




तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याचा दारू पिऊन धिंगाणा ; वरिष्ठाचे अभय ?







जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर  : धामणगाव रेल्वे – 

अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन समितीचे कार्यक्रते हे महाराष्ट्रात घडत असलेल्या घटनाना सरकारने पायबंद घालावा यासाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री याना निवेदन देण्यासाठी गेले असता तेथील शिपाई पदावर कार्यरत असलेले कर्मचारी प्रदिप साळवे हे दारू पिऊन असल्याचे निदर्शनास आले, आवक जावक मध्ये निवेदनावर ओसी घेत असताना त्या कर्मचाऱ्याने मला न सांगता आपण ओसी कशी घेतली, आना तो कागद इकडे असे म्हणत कार्यकर्त्यांसोबत वाद घातल्याची घटना २३ जून रोजी तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे येथे घडली.



 यापूर्वी हि प्रदिप साळवेला दिली होती शोकास नोटीस..



अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन समितीचे कार्यकर्ते यांनी संयमाने ऐकून घेतले व घडलेला घटनाक्रम प्रत्यक्ष तहसिलदार यांचे कडे जावून सांगितला असता तहसिलदार यांनी यापूर्वी सूध्दा कर्मचाऱ्याला शोकास नोटीस दिली असल्याचे सांगितले. 

   त्यावर कार्यालयात घडलेल्या घटनेवर आपण काय कारवाई करणार? 

कार्यलयीन वेळेत कर्मचारी लोकांना असभ्य वागणूक देऊन अनूचित प्रकार घडल्यास त्याला जबादार कोण? 

   असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले असता तहसीलदार वासीमा शेख यांनी कार्यकर्त्यासमक्ष शिपाई प्रदिप साळवेला बोलावून संबधित नायब तहसिलदार आशिष वीर यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.  


    अशा मद्यपी कर्मचाऱ्यावर शासकीय कार्यालयीन वेळेत दारू पिवून काम करणाऱ्यावर तहसिलदार साहेब काय कार्यवाही करणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.


तहसीलदारांना निवेदन देताना अखिल भारतीय दलीत अधिकार आंदोलन समितीचे पदाधिकारी 

 यावेळी अखिल भारतीय दलीत अधिकार आंदोलन समितीचे तालूका प्रमूख बाबाराव इंगोले, उपाध्यक्ष शिंलानंद झामरे, शाहिर धम्मा खडसे,मनोज अडकणे, प्रदीप सुंदरकर, बंडू शिंगणापूरे, साहेबराव अडकणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post