औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
औरंगाबाद: गोळेगाव येथील युवक वर्ग व नागरिकांनी काँग्रेसच्या विचार धारेवर राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वावर व सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीच्या कामावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव बुद्रुक येथील युवकांचा व नागरिकांचा अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सिल्लोड तालुका व शहर आढावा बैठक व प्रवेश सोहळा तालुकाध्यक्ष भास्कर पाटील घायवट, मा.पं सदस्य विक्रांत दौड, महिला आघाडी अध्यक्ष जिजाबाई अंभोरे, युवक काँग्रेस. अध्यक्ष मंगेश कळम,अक्षय पाटील, ऍड.सीताराम लिंगायत, हृषीकेश दौड, पांडुरंग दौड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न झाला.
सिल्लोड तालुका अध्यक्ष भास्कर पाटील घायवट यांचे मोठे योगदान आहे तालुक्यातील गावागावात त्यांनी पक्ष वाढीसाठी मोठे प्रयत्न केले. सत्तेत असताना व नसताना त्यांनी तालुक्यात काँग्रेसची मोठी फळी निर्माण करताना युवकांना मोठ्या प्रमाणावर पक्षाकडे आकर्षित केले.
तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे पंचायत समिती तहसील ग्रामपंचायत अंतर्गत व नागरिकांच्या सुखदुःखात व अडचणीच्या वेळेस धावून येतात तालुका अध्यक्ष घायवट साहेब यांच्या कार्याने प्रभावित होऊन अनेक युवक पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत.
त्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो अनेक पदाधिकारी व तरुण सहकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाने सिल्लोड तालुक्यात पक्ष संघटना नक्कीच बळकट होईल व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ताकद देखील वाढणार आहे.
त्या दृष्टीने सर्वांनीच पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम एकजुटीने करायचे आहे असे मनोगत सिल्लोड तालुका अध्यक्ष भास्कर पाटील यांनी केले..
यावेळी महिला आघाडी अध्यक्ष जिजाबाई अंभोरे युवक काँग्रेस अध्यक्ष मंगेश कळम अक्षय पाटील एडवोकेट सीताराम लिंगायत ऋषिकेश दोड व सिल्लोड तालुक्यातील सर्व पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते या शेकडो कार्यकर्त्याच्या प्रवेश सोहळ्यात उपस्थिती होती..