उद्योजकांना ऊर्जा देणा-या "उद्योग ऊर्जा"संस्थेचा शतकमहोत्सवी स्नेह-संमेलन सोहळा .. !

       


                                                                                        बदलापुर(गुरुनाथ तिरपणकर)-

लहान-मध्यम आणि नव्या उद्योजकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गेली पाच वर्षे अविरत सक्रीय असलेल्या लोकप्रिय उद्योग ऊर्जा संस्थेचे १००वे व्यावसायिक स्नेहसंमेलन आणि सभेचे (UU100MBBC- UdyogUrja 100 Mega Blast Business Conference)आयोजन बदलापूर येथे उल्हास नदीच्या निसर्गरम्य परिसरात असलेल्या रिव्हर व्हीलेज रिसाॅर्ट येथे ३१मे आणि १जून २०२३या दिवशी केले आहे.लहान-मध्यम व्यावसायिकांचा व्यावसायिक दृष्टिकोन अमुलाग्र बदलून ख-या अर्थाने त्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढवण्याच्या दृष्टीने काम करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.या काॅन्फरन्स मध्ये विविध विषयांवरील तज्ञांचा सहभाग असून व्यवसाय वाढी संदर्भात विविध विषयांवर येथे मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच संस्थेच्या भविष्यातील वाटचाली संदर्भात माहिती दिली जाणार आहे.मह महाराष्ट्रातील सर्व व्यावसायिक- उद्योजक- व्यापारी- दुकानदार- सल्लागार अशा सर्व समावेशक "महा बिझनेस डिजिटल डिरेक्टरी"चे यावेळी प्रकाशन होणार आहे.या व्यावसायिक सभेला डोंबिवली- कल्याण-ठाणे व मुंबई परिसरातील अधिकाधिक मित्रांनी हजर रहावे असे आवाहन आयोजक आणि संस्थेचे सह-संस्थापक ब्रँडबाॅड निलेश बागवे,सोहळ्याचे निमंत्रक जिग्नेश दवे,सह-निमंत्रक दिपक राणे व सचिन चोगले यांनी केले आहे. 

    सभेला पुर्व नोंदणी आवश्यक असुन अधिक माहितीसाठी व डिरेक्टरीमध्ये नाव नोंदविण्यासाठी राजश्री यांचेशी खालील क्रमांकावर त्वरीत संपर्क करावा.

संपर्क-उद्योग ऊर्जा  

C/oउगम क्रिएटिव्ह ९२२४४५३६७७,/९९२०१००३०८

Post a Comment

Previous Post Next Post