विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त धनगर समाज संघटना व कर्मचारी संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन स्थानिक गाडगे महाराज विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मेन रोड मूर्तिजापूर येथे ३० मे २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता करण्यात आले आहे.
गेल्या ५ वर्षापासून सतत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मूर्तिजापूरात भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. कोरोना संसर्गाच्या काळामध्ये रक्ताची कमतरता भासत असताना मे महिन्याच्या तापमानात रक्तदान शिबिराचे आयोजन करून दोन वर्षे कोरोना संसर्गाच्या काळात ही रक्तपुरवठा करण्याचे कार्य पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या शुभपर्वावर करून अनेकांना रक्त पुरवठा करण्यात आला. मुळातच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या दान दातृत्व करणाऱ्या महाराणी म्हणून जगाच्या इतिहासात नावलौकिक आहे .आपल्या अवघा ३४ वर्षाच्या राज्यकारभाराच्या कार्यकाळात महाराणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार पाहताना अनेक गरजू लोकांना आपल्या राज्यात मदत केल्याचे अनेक पुरावे इतिहासात सापडतात . राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जोपासण्याच्या उदात्त हेतूने मूर्तिजापूर येथील गाडगे महाराज विद्यालयात ३० मे २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता माजी आमदार हरिदासजी भदे यांच्या हस्ते भव्य रक्तदान शिबीराचे उद्घघाटन होणार आहे, प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य व संचालक दिनकरराव नागे अकोला, श्रीकृष्ण साबे अकोला, कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंदराव गाढवे, विठ्ठलराव पातोंड, प्रा. दिनकरराव ईसळ ,डॉ. सुरेश बचे, गोपाल गावंडे ,प्रभाकर तांबडे, डॉ. वसंतराव मुरळ, संचालक महादेवराव साबे बार्शीटाकळी, संचालक विष्णूपंत चुडे मुर्तीजापुर, संचालक कैलासराव घोंगे बाळापूर ,संचालक मंगेश भाऊ घोंगे तेल्हारा, सुरेश भाऊ जोगळे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अकोला, विनोद भाऊ नागे समाजसेवक, सुनील पंडित सर अध्यक्ष कर्मचारी संघटना मूर्तिजापूर, प्रा. एल डी सरोदे ,ज्ञानेश्वर नागे, प्रा. गजानन जोगळे ,रवी मार्कंड ,आशिष कोल्हे ,निखिल गाढवे, अक्षय भागवत , शिवदास तिरकर,वैभव काळे ,मंगेश देवकते, निलेश पातोंड, दिलीपराव सरोदे, अंकुश सरोदे, निलेश सरोदे, अंकुश तांबडे ,अतुल तांबडे, प्रा अनुप घुरडे, अनुप डवंगे, नितीन पावडे,प्रणव तांबडे,मंगेश डांगे ,दशरथ महारनर, केशवराव महारनर, व रोशन सातिंगे, मंगेश सातिंगे ,धनगर समाज संघटना कर्मचारी संघटना जय मल्हार मित्र मंडळ स्टेशन विभाग यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या भव्य रक्तदान शिबीरास सर्व समाज बांधवांनी व रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी व रक्तदानास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.