लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघा २१ विचारमंथन मेळावा.

 



दुर्दैवी राधिका इंगळे,सौ.सुमनताई धुमाळ आणि दंगलबळी गायकवाड यांना श्रध्दांजली...!


विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 

अकोला - लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा २१ वा मासिक विचारमंथन व स्नेहमिलन मेळावा स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमाला स्थानिक डाबकी रोडवरील माजी सैनिक, कर्ता हनुमान मंडळाचे अध्यक्ष,ज्येष्ठ समाजसेवक सुभाषराव म्हैसणे मामा होते.लोकस्वातंत्र्यचे संस्थापक - राष्ट्रीय अध्यक्ष व इंडीयन लॅंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन ( ईलना) चे राष्ट्रीय पदाधिकारी संजय एम.देशमुख यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात केन्द्रीय मार्गदर्शक पदाधिकारी,ज्येष्ठ समाजसेवक प्रा.डॉ.संतोषजी हुशे,विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख,साहित्त्यिक डॉ.विनय दांदळे,जिल्हा मार्गदर्शक पदाधिकारी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अशोककुमार पंड्या यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी अतिथी स्वागत आणि सुभाषराव म्हैसणे,पंड्याजी व डॉ.विनय दांदळे यांच्या कार्याचा बहूमान म्हणून त्यांना सन्मानपत्र,शाल , पुष्पगुच्छ आणि वाचन चळवळीचा शुभारंभ म्हणून ज्योतिबांचे महात्मा पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.






   ‌ यावेळी सर्वप्रथम नियमित शिरस्त्याप्रमाणे पत्रकार महासंघाच्या सामाजिक साधनेचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांना हारार्पण व वंदन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यानंतर वासनांध नराधमाच्या अत्त्याचाराला बळी पडून हत्त्या झालेल्या अकोला जिल्ह्यातील तामसी येथील येथील ६ वर्षिय बालिका राधिका इंगळे,नौपाडा,ठाणे येथील वरिष्ठ ठाणेदार संजय धुमाळ यांच्या वृध्दापकाळात निधन झालेल्या मातोश्री सो.सुमनताई,व अकोला दंगलीत बळी गेलेल्या गायकवाड व अन्य मृतांना भावपूर्ण सामुहिक

 श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.


              याप्रसंगी झालेल्या मनोगतांमध्ये सुभाषराव म्हैसणे यांनी आपले सैन्न्यदलातील अनुभव कथन करून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या उपक्रमांना शुभेच्छा व्यक्त करीत सहकार्याचे अभिवचन दिले.केन्द्रीय सचिव राजेन्द्रजी देशमुख तथा मार्गदर्शक पदाधिकारी व शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराजजी गावंडे व विजयराव बाहकर यांनी पुण्यातील संपन्न झालेल्या पद्मश्री मनिभाई राष्ट्रसेवा पुरस्कार वितरणातील १३ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीपासून प्रवास दौऱ्याचे कथन केले. बोईसरकडे जातांना नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये ठाणेदार संजय धुमाळ यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे केलेले सत्कार आणि बोईसर कोकणच्या पत्रकार पदाधिकाऱ्यांनी केलेले स्वागत आणि आदर आतिथ्यपूर्वक झालेल्या समारोहाचा सविस्तर आढावा सादर केला.यावेळी प्रा.संतोषजी हुशे, डॉ.विनय दांदळे आणि अशोककुमार पंड्या यांनीही मनोगते व्यक्त केली.अध्यक्षिय भाषणातून संजय देशमुख यांनी पत्रकार महासंघाच्या महाराष्ट्रभर होत असलेल्या मजबूत संघटनकार्याची माहिती तसेच आगामी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण,अधिवेशन या कार्यक्रमांची माहिती दिली.सध्याचा मोठा प्रतिसाद आणि विस्तार हे संघटनेच्या सर्व सभासद आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याचे यश असल्याचे सांगून अधिक समाजाभिमुख वाटचाल आणि पत्रकार कल्याण कार्य तथा संघटन विस्तारसाठी निर्माण प्रवाह निरंतर गतीने सुरू ठेवण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या.याप्रसंगी पुण्याला उपस्थित नसलेल्या उपाध्यक्ष प्रदिपजी खाडे आणि अॕड.राजेशजी जाधव यांना पद्मश्री मनिभाई राष्ट्रसेवा पुरस्कार , तर विनय दांदळे यांना विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख पदांचे संघटनेचे ओळखपत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे बहारदार संचलन व आभारप्रदर्शन जिल्हा पदाधिकारी सौ.दिपाली बाहेकर यांनी केले.

   

    ‌ या कार्यक्रमाला केन्द्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे,प्रा.राजाभाऊ देशमुख,रविन्द्र देशमुख,अॕड.राजेश जाधव,केन्द्रीय कायदेविषयक मार्गदर्शक अॕड.नितीन धूत,विदर्भ संघटक डॉ.शंकरराव सांगळे, डॉ.ए.एन.देशमुख,सतिश देशमुख,मंगेश चऱ्हाटे,दिपक शर्मा,रवि पाटणे,विष्णू नकासकर,व बहूसंख्य सभासद उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post