लेखक - ओमप्रकाश पाखरे यांचे 'शहीद भगतसिंग' हे पुस्तक आपण वाचले का ?

 






प्रतिनिधी, शशांक चौधरी -


"शहीद भगतसिंग" या नव प्रकाशित पुस्तकाचे लेखक 'ओमप्रकाश पाखरे' यांनी शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय कुऱ्हा येथे पुस्तकाच्या प्रति निःशुल्क उपलब्ध करून दिले असून,

काही दिवसांपूर्वीच 'आ. ॲड. यशोमती ठाकूर' (माजी मंत्री महा. राज्य) यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. 



 जनतेमध्ये वैचारिक प्रबोधन करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या शहीद भगतसिंह मेमोरियल ट्रस्टद्वारा पहिले पुस्तक वाचकांसाठी आणण्यात आले. शहीद भगतसिंह, त्यांचे सहकारी, त्यांचे विचार यांची माहिती तरुण युवा पिढीला व्हावी व युवकांना इतिहास माहित व्हावा या अनुषंगाने 'शहीद भगतसिंह' हे पुस्तक निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आले. याप्रसंगी शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय कुऱ्हा चे अध्यक्ष - विवेक बिंड, सचिव - अमोल भागवत, श्री. ज्ञानेश्वर मानमोडे, प्रा. रंजनसेन शेंडे, नितीन धांदे, नितेश नारळे. तसेच इतर मान्यवर उस्थितीत होते. 

 या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल लेखकांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच याप्रसंगी हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी वाचावे असे आवाहन "शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय कुऱ्हा" द्वारा करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post