समाजाच्या वंचित घटकातील व्यक्ती आरपीआय (ए) चा कार्यकर्ता असणार - जिल्हा संपर्क प्रमुख सचिन कोकणे


सचिन कोकणे व अजय प्रभे यांनी केले तालुकानिहाय शाखांचे उद्घाटन ; घेतल्या कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी




मूर्तिजापूर - रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया (ए) च्या १५ दिवसांच्या दौऱ्यात जिल्हा संपर्क प्रमुख व ठाणे जिल्हा महासचिव सचिन कोकणे व जिल्हाध्यक्ष अजय प्रभे यांनी तालुकानिहाय शाखांचे उद्घाटन करून मजबूत पक्षबांधणी केली.

       पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय महासचिव डॉ.मोहनलाल पाटील यांच्या निर्देशानुसार महीला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा सुनिता ताई चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आलेल्या जिल्हा दौऱ्यात बाळापूर तालुका कार्याध्यक्ष पदी कमलकिशोर भरतीया, अकोट तालुका ओबीसी सेल अध्यक्षपदी सागर वडतकर, शहर कार्याध्यक्ष पदी राजेश तेलगोटे यांची निवड तर पातूर तालुका, बार्शी टाकळी तालुका, तेल्हारा तालुका, मूर्तिजापूर तालुका येथे बहुसंख्य युवक, महिला यांचा पक्षप्रवेश करण्यात आला व शाखांचे उद्घाटन करण्यात आले व पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. याच दौऱ्यादरम्यान या तालुक्यातील ग्रामपंचायत, नागरिकांच्या घरकुल, पाणी समस्या सोडविण्यात आल्या.यावेळी जिल्हा महासचिव आनंदा कोकणे, जिल्हा उपाध्यक्ष पंजाबराव किर्दक, महीला जिल्हा अध्यक्षा सिमाताई सरदार, जिल्हा कार्याध्यक्षा सरितादेवी मनोहर, अकोट तालुका अध्यक्ष राजकुमार वानखडे, शहर कार्याध्यक्ष राजेश तेलगोटे, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सागर वडतकर, महीला आघाडी तालुका उपाध्यक्ष पदी अनुरिती गुहे,बाळापूर तालुका कार्याध्यक्ष कमलकिशोर भरतीया मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष गौतम अंनभोरे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष आशिष डोंगरे,युवक आघाडी तालुकाध्यक्ष संतोष कोकणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते तथा महीला उपस्थित होते.

  





 सध्या चाचपणी सुरू असून पक्ष विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका निवडणुका लढविणार आहे. ग्राम पंचायतींच्या जागा आम्ही काबीज केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित झाला असून वेळेवर नाव घोषित होईल. त्यासाठीच पक्षबांधणी करण्यात आली.

-अजय वसंतराव प्रभे

जिल्हा अध्यक्ष रिपाइं (ए)



गावागावातील समस्यांचा अभ्यास करून त्या समस्यांवरील तोडगा काढणे, गावागावात नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, शासकीय योजनांचा लाभ योग्यरित्या समसमान पातळीवर सर्वांना मिळवून देण्यावर कटाक्ष ठेवण्यावर आमचा भर असेल. त्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सतत प्रयत्नरत रहाणार.

- सचिन ध.कोकणे

अकोला जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा महासचिव रिपाइं (ए)


Post a Comment

Previous Post Next Post