९७.९ टक्क्यांसह मुलींचा वरचष्मा ; मुलांची टक्केवारी ९०.७८ ; ५९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत
विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर - तालुक्याचा बारावीचा निकाल ९३.६६ टक्के लागला असून एकूण २५ कनिष्ठ महाविद्यालयांमधून परीक्षेला प्रविष्ट झालेल्या १८४६ पैकी १७२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या निकालात मुलींचा वरचष्मा असून मुलींची निकालाची टक्केवारी ९७.९, तर मुलांची ९०.७८ आहे. ९९८ पैकी ९६६ मुले आणि ८६२ पैकी ८३७ मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्यातील एकूण ५९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ४५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९८७ द्वितीय श्रेणीत,शतर २३१ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत.
गाडगे महाराज कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा निकाल ९९.२३% लागला. गाडगे महाराज महाविद्यालय कला ९७.१४, वाणीज्य १००%, एकूण ९८.२३%, भारतीय ज्ञानपीठ कला व विज्ञान १००%, आदर्श कन्या ९७.१४%, जे.बी.न.प. हिंदी ९२.५९ %, सिद्धार्थ ९०%, गाडगे महाराज व्होकेशनल ९३.९३%, अ.दे.व्होकेशनल हिरपूर ८५.४१%, जी.एम टेकाडे कुरूम विज्ञान १००%, कला ७५.४७%, एकूण ९७.५६% अ.दे.हिरपूर विज्ञान ९८.६४, कला १००%, वाणीज्य ९२% एकूण ९७.५६%, विद्याभारती शेलू बाजार ९१.१७%, अनवर उर्दू माना १००%, विठ्ठल रुखमाई निंभा ७८.५०%, सुनिल राठोड दहातोंडा ७४.१९%, जवाहर जामठी ८०%, वसंतराव नाईक हातगांव १००%, स्वामी विवेकानंद मंगरूळ कांबे ९४.४४%, छगन भुजबळ कंझरा ८६.६६%, अर्चना लाखपुरी ७०%, धाबेकर कुरूम ९३.३३%, गुलाबराव बांबल किनखेड ८९.४७%, मेरसिंग राठोड आश्रम विज्ञान१००%, कला ७३.१७%, भाऊसाहेब देशमुख घुंगशी ८९.१३%, गुलाबराव गावंडे बोरगाव निंघोट विज्ञान ९६.८७, कला ९३.९३%, बबन चौधरी ब्रम्ही९८.३३%, संकेत कांबे पारद ९५.३४%, इमामुल्लाह कासवी ८३.३३%.