शिवरच्या विदर्भ संगीत व सांस्कृतिक कला प्रसारक मंडळाचा पुढाकार
अमरावती - जिल्ह्यातील दर्यापूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवर बु या छोट्याश्या गावात मुकुंद नितोणे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या विदर्भ संगीत व सांस्कृतिक कला प्रसारक मंडळाच्या वतीने कलावंतांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन पुण्यात केले जाणार आहे.
न्याय व हक्कासाठी लढणारे आणी कलावंतांनी कलावंतांसाठी निर्माण केलेले निर्भीड निपक्ष निस्वार्थी कलाकार संघटन विदर्भ संगीत व सांस्कृतिक कला प्रसारक मंडळ या कलावंतांच्या संस्थेद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर " कलाकार जोडो " ही मोहीम राबविल्या जात असून त्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील दुर्लभ दुर्लक्षित गरीब व संघर्ष करणाऱ्या कलावंतांना संघटित करण्याचे काम संस्था करत आहे कालच पुणे जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग संपन्न झाली.
संस्थेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभू जाचक महिला अध्यक्ष अभिनेत्री अंजली गाढवे सचिव शशिकांत इंगळे कार्याध्यक्ष उमेश सदाशिव ( संचालक रुद्र फोटोग्राफी अँड व्हिडिओ एडिटिंग ) इत्यादी पदाधिकाऱ्यांनी या कलावंत मेळाव्यासाठी तन-मन-धनाने सहकार्य करण्याचे आश्वासन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद कुमार नितोणे यांना दिले.
पुण्या प्रमाणेच औरंगाबाद, लातूर ,नागपूर, बुलढाणा ,जळगाव व संपूर्ण महाराष्ट्रभर संस्थेच्या वतीने कलावंत मिळावे घेऊन कलावंतांचा सन्मान सत्कार करून कलावंतांची कला विकसित करून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम संस्था करणार आहे सदर मेळाव्यात जास्तीत जास्त कलावंतानी सहभाग घ्यावा असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. मुकुंद कुमार नितोणे यांनी यावेळी सांगितले.