कर्मयोगीने साठी ओलांडलेल्यांना दिला काठीचा आधार..

 






Reporter/शशांक चौधरी - 


कर्मयोगी फाऊंडेशन हे कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारसरणी नुसार सत्य, सातत्य, शिस्त व समर्पण, या चारसूत्री वर कार्य करत आहे.

कर्मयोगी फाऊंडेशनने विदर्भातील वृद्ध मंडळींच्या चेहऱ्यावर हास्य फ़ुलविण्याचा निर्धार केला आहे.  त्याच अनुषंगाने २७ जून २०२१ पासून वृद्ध मंडळींना आधार काठी (कुबळी) देण्यास त्यांनी  सुरवात केली व ही सुरवात  दिनांक २१ मे २०२३ ला १०७ व्या गावी म्हणजे घुसळी या गावी जाऊन पोहोचली. ग्रामपंचायत घुसळी (कामनापूर), तहसील धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती येथे आधार काठी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करून, या गावातील १७ वृद्ध मंडळीना आधार काठी देऊन त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमरूपी हास्य फुलविण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष घुसळी ग्रामचे सरपंच राजेंद्र बांते, उदघाटक कर्मयोगी फाऊंडेशनचे सरचिटणीस शिवाजी बारेवार प्रमुख उपस्थितीमध्ये उपसरपंच सुभाष डबले, पोलीस पाटील चंद्रशेखर कडू,

 वाढोणा गायकवाड गावचे उपसरपंच विजय पाटील, कर्मयोगी फाऊंडेशनचे धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष विनोद तितरे, सचिव राजुभाऊ निस्ताने, नितीन सोनटक्के ही मंडळी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होती. 

 उदघाटनिय भाषणात शिवाजी बारेवार म्हणाले की 'कर्मयोगी फाऊंडेशन हे "बोलते नव्हे तर कर्ते व्हा" या तत्वावर निरंतर कार्य करत आहे. आम्हाला जीवनाचा अर्थ समजला आहे, या जगात लोकांना भरभरून मदत करणे व प्रेम देणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. आपलं जीवन हे या सृष्टीसाठी उपयोगी ठराव ते निरुपयोगी ठरू नये हाच आमचा ध्यास आहे. कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांनी जनकल्याणासाठी अनेक संकल्प घेतले आहे, ते पुर्णत्वास नेण्याचा आम्ही सातत्याने यशस्वी प्रयत्न करत आहोत. 

यावेळी सामाजिक कार्य करणारे व कर्मयोगी फाऊंडेशनला मोठ्या प्रमाणात सहकार्य करणारे धामणगाव रेल्वे येथील जितेंन मालोदे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांची प्रतिमा देऊन  कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी व घुसळी ग्राम वासीयांनी यशस्वी मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post