विदर्भ संपादक मिलिंद जामनिक,मूर्तिजापूर - मूर्तिजापूर पासून १५ किलोमिटर अंतरावरील पळसो बढे येथील मुळ रहिवासी डॉ.विलास आठवले यांची राज्याच्या विधिमंडळ सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल अजय प्रभे , रोहीत सोळंके मित्रमंडळ व येथील पत्रकारांच्या वतीने त्यांचा येथील विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दीपक जोशी यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमाला विशाल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी परभणी, ओमप्रकाशजी,नितीन तायडे मुंबई,सुमित नागदेवे, ज्येष्ठ पत्रकार अनिल अग्रवाल. विलास नसले, धनराज सपकाळ, उद्धव कोकणे...
विलास वानखडे, रोहित सोळंके, संतोष माने, निलेश सुकसोहळे, आनंदा कोकणे, पंजाबराव किर्दक, उद्धव कोकणे,संतोष कोकणे, सुभाष प्रभे, विलास वानखडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल इंगोले,सुनील वानखडे, निलेश तायडे, नागोराव तायडे, यांच्या सह अजय प्रभे मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.सुत्रसंचालन पत्रकार अजय प्रभे यांनी तर आभार विलास वानखडे यांनी मानले.