धोत्रा शिंदेंच्या आरोग्य केंद्राची रात्रीच्या वेळी घेतली झाडाझडती : आरोग्य सेवाच ?
मूर्तिजापूर पं.स. सभापती आम्रपाली तायडे ऍक्शन मोडवर
विदर्भ संपादक मिलिंद जामनिक,मूर्तिजापूर : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या धोत्रा शिंदे येथील आरोग्य केंद्राला सभापती आम्रपाली तायडे यांनी २९ मे रोजी रात्रीच्या वेळी आकस्मिक भेट देवून झाडाझडती घेतली असता आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले असून पाहणी केल्यावर सावळा गोंधळ लक्षात आला .
दिवसेंदिवस आरोग्य यंत्रणेचे लक्तीरे वेशीवर टांगले जात असून धोत्रा शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सालतवाडा येथील उपकेंद्र बंद असल्याने उपचाराअभावी १४ मे रोजी निशांत वानखडे या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधीकडून करण्यात आला होता . याबाबत वरिष्ठांकडे तक्रारीसुध्दा करण्यात आले आहे . या अनुषंगाने सभापती आम्रपाली तायडे यांनी रात्री आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली असता ११ पैकी ४ जण मुख्यालयी हजर दिसले . सर्व शौचालयात अस्वच्छता तसेच दुर्गंधी दिसून आली . शल्यचिकित्सक , प्रसूती , वार्मर बाक्स , आंतररुग्ण ,उष्णघात कक्षात सर्वत्र धूळ व अस्वच्छता दिसून आली . वैधकीय अधिकारी डाँ आर आर राठोड हे मुख्यालयी हजर राहत नसल्याने रुग्णांना योग्य सेवा मिळत नसल्याची माहिती ग्रामस्थांकडून प्राप्त झाली . कनिष्ठ सहायक परकाडे मुख्यालयी हजर नसल्याने स्टॅ!क बुक व ईतर महत्वाचे दस्तावेज तपासणीस अडथळा निर्माण झाला . यासह ईतर ही समस्या बाबत सभापती आम्रपाली तायडे यांनी शेरेबुकात शेरा लिहला आहे . सर्वत्र कारभार आलबेल असल्याने रुग्णसेवा खंडित झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे .
हजेरी पत्रकावरून दोन परिचर गैरहजर असल्याचे दिसून आले .
औषधी निर्माता हे पद रिक असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे . सहायक कनिष्ठ लिपिक हे मुख्यालयी हजर राहत नसल्याने आरोग्य यंत्रणेला अडथळा निर्माण होतो .
----------------------------------------
धोत्रा शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली असता येथे ११ पैकी ४ अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी हजर दिसून आले . सर्व शौचालयात दुर्गंधी व घाण आढळून आली . शल्यचिकित्सक , प्रसूती , आंतर रुग्ण , उष्माधातक्षा सह ईतर ठिकाणी साफसफाई नसल्याने धूळ दिसून आली . सर्व भोंगळ कारभार दिसून आल्याने या बाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे . मूर्तिजापूर पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाची अशाच प्रकारची माहिती घेण्यात येणार आहे . कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची हयगय करण्यात येणार नाही .
आम्रपाली सचीन तायडे
सभापती
पंचायत समिती मूर्तिजापूर