महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघातर्फे पत्रकारिता प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

 







मुंबई(गुरुनाथ तिरपणकर)-कै.अशोक तोडणकर यांच्या प्रेरणास्थानातुन महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाच्यावतीने वृतपत्रीय लेखनाची आवड असणा-या युवा,युवती,व्यक्ती,महिला यांना आपल्या व्यक्तिमत्वाला उंचीमय व निर्भिड बनविण्यासाठी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाच्यावतीने रविवार दिनांक ११ जून २०२३ रोजी सुरेंद्र गावसकर सभागृह,दादर येथे पत्रकारिता प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरासाठी नोंदणी शुल्क५००/-(पाचशे रुपये)ठेवण्यात आले आहे.या शिबिरात विविध नामांकित पत्रकारांचे महत्वपूर्ण पत्रकारिता विषयक विविधअंगी अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे.या पत्रकारिता प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिरात चहा-नाष्टा,व सुग्रास भोजन व्यवस्था केलेली आहे.

    सहभागी प्रशिक्षणार्थिंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.तरी इच्छुक व्यक्तींतीनी या शिबिराचा लाभ घ्यावा.व

   अधिक माहितीसाठी संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर-९८९२९९४१२१आणि सचिव सुनिल शिर्के-८८९८३३४५८० यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post