मूर्तिजापूरच्या उड्डाण पुलावर दर्यापूर व मूर्तिजापूर शहर पोलिसांनी गोवंश घेऊन जाणारा ट्रक पकडला

 



गोवंशाना दिले जीवनदान ; दर्यापूर पोलीसांची धाडसी कारवाई 




विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
 

 मूर्तिजापूर - शहरालगत असलेल्या उड्डाणपुलावर अवैधरित्या गोवंश घेऊन जाणारा ट्रक दर्यापूर व मूर्तिजापूर शहर पोलिसांनी पकडला सदरचा ट्रक छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

          प्राप्त माहितीनुसार दर्यापूर वरून 50 ते 60 हून अधिक गोवंश घेऊन जाणारा आयशर ट्रक क्रमांक सि. जि.04 एन झेड 6928 हा छत्तीसगड येथून गोवंश घेऊन अवैद्यरित्या छत्तीसगडची सीमा पार करून महाराष्ट्र मध्ये दाखल झाला असल्याची माहिती अमरावतीचे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण ठाकूर प्रमोद सिंह गडरेल यांना मिळाली यावरून त्यांनी चांदूर बाजार पासून सदर ट्रकचा पाठलाग करत येत असताना दर्यापूर पोलिसांना माहिती दिली असता दर्यापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष ताले यांनी यांच्या ताफ्या सह ट्रकचा पाठला केला व जवळ अकोला जिल्ह्याची सीमा येत असल्याने मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन यादव यांना माहिती दिली असता शहर पोलीसांनी नाकाबंदी करून दर्यापूर पोलीस व मूर्तिजापूर शहर पोलिसांनी भारतीय जनता पार्टी व बजरंग दल तसेच विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मूर्तिजापूर शहरालगत असलेल्या दर्यापूर रोडवरील उड्डाणपूलावर सदर ट्रक पकडला या ट्रकमध्ये 50 ते 60 हुन अधिक गोवंश छत्तीसगड वरून कत्तली करता कोंबून नेत असल्याचे आढळले.



    यावेळी भारतीय जनता पार्टी व विश्व हिंदू परिषद सह बजरंग दलचे कार्यकर्ते उपस्थित होते.



अवैध गोवंश तस्करी करत असलेला ट्रक महाराष्ट्र सीमेत दाखल होत असल्याची माहिती मिळाली असता दर्यापूर हद्दीत नाकाबंदी केली होती परंतु ट्रक चालकाने पळ काढल्यामुळे सदर ट्रकचा पाठलाग केला असता अकोला जिल्ह्याच्या मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रकला पकडण्यात यश मिळाले.


संतोष ताले 

पोलीस निरिक्षक 

पोलीस स्टेशन दर्यापूर

Post a Comment

Previous Post Next Post