औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
औरंगाबाद,सोयगाव :- येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचा 95.32 टक्के निकाल लागला आहे.
यामध्ये विज्ञान शाखेत सोयगाव ची पूजा विजय काळे,,(७७.८० टक्के) गुण मिळवून प्रथम आली आहे.
यामध्ये कला शाखा 91 टक्के, विज्ञान शाखा 100 टक्के, वाणिज्य शाखा 95. 08 टक्के व एमसीव्हीसी 92 टक्के निकाल लागला आहे,दरम्यान सोयगाव च्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम-पूजा विजय काळे द्वितीय- वैभव दाभाडे(७६.६१ टक्के) तर तृतीय-पराग देशमुख(७६ टक्के) याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे निकाल जाहीर झाला आहे.
दैनिक बाळकडू चे पत्रकार विजय काळे यांची मुलगी पूजा काळे हिचा प्रथम क्रमांक मिळाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. संस्थेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रंगनाथनाना काळे, सचिव प्रकाशदादा काळे, प्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे, कनिष्ठ विभाग प्रमुख डॉ उल्हास पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी परिश्रम घेतले.
गावाकडची बातमी साठी आजचं आमच्या तुमच्या जिल्ह्यातील प्रतिनिधीशी संपर्क साधा..
मुख्य संपादक देवेंद्र भोंडे