विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर - तालुक्यातील माना येथे अत्यंत विषारी समजला जाणारा मन्यार जातीच्या सापाला सर्पमित्राने दिले जीवनदान मरी माता चे मंदिर परिसरात होत काम करताना मजुरांना दहा विषारी मण्यार जातीच्या सापाचे अंडे व त्या भोवती खेळत असलेला मण्यार जातीचा विषारी साप तेथील मजुरांना खोदकाम करताना दिसला. व खोदकाम करणारे मजूर हे घाबरले.
त्यातील एका मजुराने माना येथील अमित गोंडाने या सर्पमित्राला दूरध्वनीवर फोन करून सर्व हकीकत सांगितले. व क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्र अमित गोंडानेहा युवक घटनास्थळी दाखल होऊन मोठ्या सीताफितीने त्याने हा मण्यार जातीचा साप पकडून त्यांनी बॉटलमध्ये बंद केले. भारतामध्ये प्रथम क्रमांकावर असलेला नागापेक्षा पाच पटीने अत्यंत विषारी असलेला हा मण्यार साप त्यांनी पकडला. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे हा साप जास्तीत जास्त मध्यरात्री हा मनुष्याला चावणारा आहे. या सापाला मनुष्याची गर्मी ही आवडते म्हणून हा साप घराच्या जवळपास असला तर आपल्या जवळ येऊन झोपू शकतो. झोपेत तुम्ही जर त्याला धक्का लावाल तर तो तुम्हाला ज्याप्रमाणे मच्छर माणसाला चावते. त्याप्रमाणे तो माणसाला चावा घेतो. यावर तातडीने उपचार न केल्यास मनुष्य हा दगावतो.