विदर्भ संपादक,मुर्तिजापुर - ग्रामीण विकास मंत्रालय यांनी " नयी चेतना:पहल बदल की " नावाची लींग आधारित भेदभाव दूर करण्यासाठी राष्ट्रीय जेंडर मोहीम सुरु केली असून त्याधरतीवर दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY NULM) अंतर्गत दिनांक २८ डिसेंबर रोजी विविध प्रकारचे हिंसाचार ही थीम म्हणून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये बचत गटातील महिला,वस्ती स्तर संघ,शहर स्तर संघातील महिला पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.रॅलीची सुरुवात स्टेशन विभाग येथून सुरू होऊन समारोप नगर परीषद कार्यालय येथे करण्यात आला.यावेळी नगर परीषद कार्यालय प्रांगणा मध्ये प्रशासक तथा मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून उपस्थित सर्व महिलांना सदर योजनेचे सहा. प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल यांनी हिंसाचार मुद्यावर लिंगभाव समानता प्रतिज्ञा चे वाचन करून सर्व महिलांना प्रतिज्ञा दिली.यावेळी उमेद एन आर एल एम च्या वर्षा पुंड मॅडम यांनी महिलांवर होणारे विविध प्रकारचे हिंसाचार या मुद्द्यावर मार्गदर्शन केले.यावेळी शहर स्तर संघाच्या अध्यक्ष दुर्गा मोहिते,समूदाय संघटिका रुबिना परवीन,सुनंदा येवतकर,सुजाता मुलमुले, प्रभा माने,अनिता देविकर,सोनल लोखंडे ,शालिनी खंडारे,वैशाली सोनुने,विलास ठाकरे व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.