अपूर्वा माधव बन्सोड 98.4 टक्के गुण घेत शाळेतून पहिली

 


नवोदय विद्यालय तळोधी (बा) येथून पहिली येण्याचा मान पटकाविला


सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव 


                 


चंद्रपूर / चिमूर , सुनिल कोसे: केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला. असून जवाहर नवोदय विद्यालय तळोधी बाळापूर येथील दहाव्या वर्गात शिकणारी अपूर्वा माधव बन्सोड हिने 98.4 टक्के गुण प्राप्त करीत शाळेतून पहिली येण्याचा मान मिळविला आहे.

             जवाहर नवोदय विद्यालयाची शिस्त आणि अपूर्वा ची नियमित अभ्यास कठोर पारिश्रम तसेच शाळेतील शिक्षक व आई वडिलांचे मार्गदर्शन हेच यशाचे गमक असल्याचे सांगितले आहे.

        या यशाचे श्रेय अपूर्वाने प्रिन्सिपल मॅडम सर्व शिक्षकवृंद आईवडिलांना दिले आहे.

    तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून तालुक्यातून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे अपूर्वाने वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक पदावर कार्यरत आहेत.नोकरी सांभाळून मुलांच्या अभ्यासाकडे त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.

   बारावी नंतर चांगले यश संपादित करून डॉक्टर किंव्हा इंजिनियर होण्याचा मानस अपूर्वाने व्यक्त केला आहे..

Post a Comment

Previous Post Next Post