गावातील कर्तबगार महिलांचा सन्मान चिन्ह प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन केला सत्कार
गावाकडची बातमी/ सुनिल कोसे
चंद्रपूर /चिमूर : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या सावरगाव येथे ग्रामपंचायत च्या कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची 298 वि जयंती मोट्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच या निमित्ताने अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान म्हणून गावातील कर्तबगार महिलांचा शाल श्रीफळ सम्मानचिन्ह ,प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा सत्कार करण्यात आला.
सावरगाव तालुक्यातील मोठे गाव असून अनेक विविध उपक्रम राबविण्यात अनेक कार्यक्रम राबविण्यात नावारूपास असलेले गाव आहे अशाचप्रकारे गावातील महिलांचा सन्मान करण्यासाठी व महिलांना प्रेरणा मिळविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात दि 31 मे ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून शीतल धारने सरपंच, एस जी उराडे, ग्रामसेवक अजय पराते ,उपसरपंच देवानंद गावंडे तमुस अध्यक्ष एझरकर मॅडम कृषी अधिकारी प्रविनजी मेहरकूरे तलाठी आदी मान्यवर म्हणून उपस्थित होते सर्व प्रथम अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली यानंतर मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली मान्यवरांनी अहिल्यादेवी यांच्या जीवनावर तसेच त्यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाला गावातील महिला मंडळी उपस्थित होत्या..
यानंतर अहिल्यादेवी होळकर महिला सम्मान म्हणून गावातील दोन कर्तबगार महिलांना गौरविण्यात आले यात श्रीमती वसुधा विनोद नाकाडे,आणि रेखा संजय नेवारे यांना शाल श्रीफळ सम्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उजवला शेंदरे माजी उपसभापती नामदेव बारेकर चिंतामण पा नाकाडे देविदास मुरकुटे मुनाभाऊ धापटे यशवंत सोरदे सूरज श्रीरामे हेमंत शेरकी ग्रा प कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी गावातील महिला तरुणी नागरिक उपस्थित होते मार्गदर्शन कार्यक्रम आटोपल्यावर अल्पोहर व प्रसाद वितरणाचे कार्यक्रमाची सांगता झाली..