जळगाव,एस कृष्णा रौराळे :- जळगाव येथील प्रसिद्ध साहित्तिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांचा १ जून वाढदिवस असून ते या दिवशी ६४ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत .
जयसिंग वाघ यांचा विविध सामाजिक , साहित्तिक चळवळीत सक्रिय सहभाग आहे . विविध विषयांवर ते विविध वृत्तपत्रात लेखन करीत असतात , ते एक उत्कृष्ट समीक्षक म्हणूनही प्रसिद्ध असून त्यांच्या १०० च्या जवळपास समीक्षा प्रसिद्ध झालेल्या आहेत , त्यांचे ६ पुस्तकं प्रसिद्धआहेत , ३०० पेक्षा अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत याच बरोबर ते अतिशय परखड़ पणे भाषण करतात त्यांची महाराष्ट्रभर भाषणे झालेली आहेत. ते १३ व्या महाराष्ट्र दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते .त्यांनी विविध साहित्य संमेलनात वक्ता , परिसंवाद अध्यक्ष म्हणून सहभाग नोंदविला आहे .
जळगाव मध्ये तीन साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन केले असून विविध साहित्य संमेलनांच्या यशस्वीतेत सक्रिय सहभाग घेतलेला आहे साहित्य व सामाजिक क्षेत्रातील विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत .
तसेच काही संस्था , संघटनां तर्फे त्यांचा नागरी सत्कार झालेला आहे.