मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना इ रिक्षा वाटप

  



समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत माजी जी प सदस्य मनोज मामीडवार संजय गजपुरे यांच्या हस्ते इ रिक्षा वाटप


         

चंद्रपूर / चिमूर, जिल्हा प्रतिनिधी सुनिल कोसे:      समाज कल्याण विभाग जिल्हा परिष चंद्रपूर कडुन जिल्हा निधी 20 टक्के सेसफंड योजने अंतर्गत मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजना मधून लघुउद्योगाकरीता अर्थसहाय्य करून सण 2022 -23 या वर्षासाठी माजी जिल्हा परिषद सद्स मनोज मामीडवार यांच्या समाजकल्याण निधीतून नेरी विभागातील पात्र लाभार्थ्यांना दि 30 मे ला माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज मामीडवार संजय गजपुरे यांच्या हस्ते इ रिक्षा वितरित करण्यात आले..

                सण 2022 -23 या वर्षात लाभार्थ्यांना विविध योजने अंतर्गत लाभ मिळाला परंतु काही तांत्रिक कारणांनी सदर योजनेच्या लाभला उशीर झाला परंतु लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून नेरी सिरपुर जिल्हा परिषद क्षेत्रातील चार लाभार्थ्यांना इ रिक्षा चे लाभ देण्यात आले.

    यात रागिना प्रशांत सोनवाने लोहारा दिवाकर डहारे सिरपुर नरेश मोहिणकर नेरी कवडू लोणारे लोहारा या लाभार्थ्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज मामीडवार, संजय गजपुरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले सदर योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल लाभार्थ्यांनी मनोज मामिडवार व जी प चे आभार मानले..

Post a Comment

Previous Post Next Post