ज्येष्ठ विधीज्ञ नरेंद्र काळे यांचे ४८ तासांचे उपोषण सशर्त स्थगित

 




विदर्भ संपादक मिलिंद जामनिक


 मूर्तिजापूर - वर्षानुवर्षे पडीत असलेल्या मात्र आता ले-आऊट होऊ घातलेल्या भूखंडांमधून ६० फूट रुंदीचा डीपी रस्ता टाकावा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनकल्याणाच्या हेतुने येथील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नरेंद्र काळे यांनी दिनांक २६ डिसेंबर पासून सुरू केलेले ४८ तासांचे उपोषण मुख्याधिकारी तथा नगर पालिका प्रशासक सुप्रिया टवलारे यांच्या मध्यस्तीनंतर दिनांक २७ डिसेंबर रोजी सशर्त स्थगित करण्यात आले. 

           यासंदर्भात दिनांक ५ डिसेंबरला ॲड.काळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गेली अनेक वर्षे डागा/सारडांचे शेत पडीत आहे. चिखली पासून येणाऱ्या ६० फुटांच्या रस्त्यात त्यांचे रहाते घर आहे. ते आता टाकणार असलेल्या ले-आऊट मध्ये ६० फुटांचा डीपी रस्ता सोडावा, अशी मागणी केली होती. संपूर्ण रस्ता खोदून काढण्यात आला असून आम जनतेचा रस्ता बंद झाल्यामुळे सर्वांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या लेआऊट मागील भागात जाण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर आहे. याशिवाय उपलब्ध असणारा गवारी पुरा भागातून जाणारा रस्ता आत्यंत चिंचोळा आहे, तर दुसरा मंगळवार बाजारातून जाणारा रस्ता चिंचोळा तर आहेच शिवाय अत्यंत वर्दळीचा आहे आणि रेल्वेस्थानकासमोरून जाणारा खूप लांब आहे, त्यामुळे या भागात जाणाऱ्यांना व त्या भागातील रहिवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे. एखादी दूर्घटना घडली, तर अग्नीशमन बंब किंवा ॲम्बुलन्स पोचायला वेळ लागून जीवाशी खेळ होण्याची शक्यता विचारात घेऊन ॲड.काळे यांनी जनकल्याणार्थ हे उपोषण सुरू केले होते. असंख्य नागरिकांनी उपोषणमंडळाला भेट देऊन स्वाक्षरीनिशी उपोषणाला पाठिंबा दिला होता, मात्र आज पालिका प्रशासक सुप्रिया टवलारे यांनी ॲड.काळे यांची उपोषणस्थळी भेट घेतली व रस्ता ६० फूट रूंदीचा होईल, यासाठी नियमानुसार कार्यवाही करण्याचे अभिवचन त्यांना दिले. नगररचना कार्यालयाची तांत्रिक समिती दिनांक २८ डिसेंबर रोजी पालिकेत येणार असून याप्राकरणी आक्षेप दाखल करणारे त्यांच्यासमोर आपली बाजू मांडू शकतात, असेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर ॲड.काळे यांनी उपोषण स्थगित केले.

Post a Comment

Previous Post Next Post