गाव सहेली/ रुचिका वानखडे,विदर्भ : श्रीमती कल्पना कृष्णराव सावळे ह्या अतिशय शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक शिस्तबध्द अशा आरोग्य विस्तार अधिकारी असुन त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन स्त्री शक्ती मंच संघटनेच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षा शारदा अतुल भुयार यांनी त्यांची विदर्भ महिला संघटिका पदी नियुक्ती केली.
स्त्री शक्ती मंच संघटनेचा उद्देश तळागाळातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न करणे, शासनाच्या अनेक योजना आहे.
त्यांच्या पर्यन्त पोहचविणे शहरापासून तर गावापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात महिला निवड करण्यात येणार आहे.
श्रीमती कल्पना सावळे जिल्हा परिषद मध्ये आरोग्य कर्मचारी संघटनेमध्ये 2006 ते 19 पर्यंत अध्यक्ष म्हणून संघटनेचे काम केलेले आहे..
अनेक सामाजिक विषयावर त्यांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले. महिलांच्या अनेक विषयावर त्यांनी प्रशिक्षण दिले.
नागपूर, अमरावती, पुणे, कोल्हापूर, ठाणे, मुंबई ,कल्याण येथे प्रशिक्षण दिले.
शिवाय निवृत्त झाल्यानंतरही प्रशिक्षण देत आहे.
हे उल्लेखनीय स्वच्छ भारत मिशन, मासिक पाळी, कचरा व्यवस्थापन यासाठी सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर अशे कार्य केले ते अतिशय शिस्तबद्ध प्रशिक्षक आहेत.
तेवढयाच प्रेमळ आहेत. हे आम्हा स्त्रियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.सोबत काम करताहेत हे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.
महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधावा..