बळीराज्याच्या तोंडचा घास हिरावला ; तुरीचे पीक पुर्णतः सुकले

 





जगाचा पोशिंदा राहीला नावारुपाचा ; पोशिदयांची दैना कुणाला कळेना ?



मूर्तिजापुर - शेतकरी म्हटल की अनेक समस्याना तोंड देणारे माहेर घर अशातच भली मोठी आशा उराशी बाळगून यावर्षी तूरीच्या पीकाचे उत्पादन चांगले होईल परंतू मधातच निसर्ग कोपला वातावरणात अचानक बदल झाला अन गजबज सजलेल्या तुरीच्या झाडाच्या झाल्या तुराट्या त्यामुळे बळीराज्यावर मोठे संकट आले आहे.

 तालुक्यात सतत धुके पडत असल्याने व ढगाळ वातावरणामुळे तुरी जागेवरच सुकत आहेत. काही प्रमाणात शेंगा धरल्या असल्या तरी त्या न भरताच वाळायला सुरुवात झालेली दिसून येत आहे. उभी पिके लागली वाळू : गावगाड्यात चर्चा मुर्तीजापुर तालुक्यात वातावरणात झालेल्या बदलामुळे उभे तूर पीक वाळू लागल्याने तुरीच्या तुराट्या झाल्या हो...अशीच चर्चा आता गावोगाव खेड्यात होताना दिसून येत आहे.

 तुरीचे उत्पन्न फायद्याचे होईल, अशी शेतकऱ्याला आशा होती. मात्र, सतत धुके पडत असल्याने व ढगाळ वातावरणामुळे तुरी जागेवरच सुकत आहेत. काही प्रमाणात शेंगा धरल्या असल्या तरी त्या न भरताच वाळायला सुरुवात झालेली दिसून येते. यावर नेमकी काय उपाययोजना करावी, याची शेतकऱ्याला माहिती नाही. तुरीचे पीक खर्च केल्यानंतर हातचे जाईल या भीतीने शेतकरी धास्तावलेल्या स्थितीत दिसून येत आहे.पुढील जीवन जगायचे कसे हाच प्रश्न पडलेला असल्याने शासनाने तुरीचा सर्वे करून शासकीय मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post