हजारो लिटर पाण्याची होतेय नासाडी ; मुख्य पाईप लाईनवरील व्हॉल्व्हमधून पाणी लिकेज

 



संबंधित विभागाचे दुर्लक्ष ; संभाव्य होणाऱ्या पाण्याच्या दुष्काळासाठी जबाबदार कोण ?


 मूर्तिजापूर - शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनवरील व्हॉल्व्हमधून हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याने जनसामान्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 असे म्हटले जाते,पाणी असेल तर जीवन आहे, मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मूर्तिजापूरसह अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य लाइनला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

     हे लक्षात असायला हवे की, लंघापूर ५७ खेडी गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ग्रामीण भागातील अनेक गावांना उमा धरण खांदला येथून पाणीपुरवठा केला जातो. ज्याची मेन लाईन खेर्डा ते मूर्तिजापूर दरम्यान मूर्तिजापूर कारंजा रस्त्यालगत टाकण्यात आली आहे. या मेन लाईनवर दहातोंडा गेट जवळील व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. थेंब थेंब जप करणे आपले कर्तव्य आहे. जेणेकरून येत्या उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईची समस्या उद्भवणार नाही, मात्र अशाप्रकारे होणारा पाण्याचा अपव्यय पाहून जनमाणसात चर्चेचा मुद्दा होऊन जीवन प्राधिकरण संदर्भात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post