सांगोला :- सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिंचोली येथील प्रा . कु . अंजली जाधव यांना लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी मुंबई येथील आयोजित कार्यक्रमात श्रद्धा जाधव ( मा. महापौर , मुंबई महानगरपालिका ) , स्नेहल भोपळे ( अभिनेत्री ) , अॅड . आशाताई लांडगे ( मा . सदस्या , महाराष्ट्र राज्य महिला आयोग , महाराष्ट्र शासन ) , स्मिता बोंदरेकर ( मा . सदस्या , श्री . सिद्धिविनायक मंदिर न्यास , मुंबई – महाराष्ट्र शासन ) , डॉ . प्रविण निचत ( आरोग्य दुत व अध्यक्ष , होप फाऊंडेशन ) , संगीताताई गुरव ( समाजसेविका व उद्योजिका ) , सारा वाडेकर – मंडलिक ( संपर्क प्रमुख , लेक लाडकी अभियान , महाराष्ट्र ) विजय भोसले ( संपर्क प्रमुख , शिव शंभू संघटना , महाराष्ट्र राज्य ) , सुभाषराव गायकवाड ( आरोग्य मित्र ) , सुरज भोईर ( लेक लाडकी अभियान , मुंबई ) या सर्वांच्या हस्ते राज्यस्तरीय भारत गौरव राष्ट्रचेतना पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित करण्यात आले .
स्वातंत्र्याचा गौरवशाली अमृत महोत्सव व साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना राज्यस्तरीय भारत गौरव राष्ट्रचेतना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . यामध्ये प्रा . कु . अंजली जाधव यांना ही राज्यस्तरीय भारत गौरव राष्ट्रचेतना पुरस्कार २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . प्रा . कु . अंजली जाधव या माणदेश अध्यापक विद्यालय जुनोनी या ठिकाणी प्राध्यापिका या पदावरती कार्यरत आहेत . शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत . आपल्या कामगिरीचा ठसा उमटविल्याने प्रा . कु . अंजली जाधव यांना लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य यांनी राज्यस्तरीय भारत गौरव राष्ट्रचेतना पुरस्कार २०२२ बहाल केला आहे .
आतापर्यंत त्यांना काही निवडक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे . सदरचा कार्यक्रम हा प्रेस क्लब हॉल मुंबई , पत्रकार भवन शेजारी , आझाद मैदाना जवळ , महापालिका मार्ग , सी .एस . एम . टी . ( व्ही . टी . स्टेशन समोर ) , मुंबई – ०१ या ठिकाणी पार पडला . प्रा . कु . अंजली जाधव यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या वरती आसपासच्या परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे . तसेच अभिनंदन केले जात आहे . व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत .